नाशिक बनले वन्यजिवांचे ‘कॉरिडोर’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:10 AM2018-11-05T06:10:57+5:302018-11-05T06:11:31+5:30

जिल्ह्याची ओळख बिबट्यांचे माहेरघर अशी होत असताना अन्य वन्यजीवांसाठीदेखील जिल्ह्याचा परिसर उत्तम ‘कॉरिडोर’ बनत आहे. अलीकडेच शहराजवळ चक्क रानगव्याची भ्रमंती दिसली.

Nashik Wildlife 'Corridor' | नाशिक बनले वन्यजिवांचे ‘कॉरिडोर’

नाशिक बनले वन्यजिवांचे ‘कॉरिडोर’

Next

नाशिक : जिल्ह्याची ओळख बिबट्यांचे माहेरघर अशी होत असताना अन्य वन्यजीवांसाठीदेखील जिल्ह्याचा परिसर उत्तम ‘कॉरिडोर’ बनत आहे. अलीकडेच शहराजवळ चक्क रानगव्याची भ्रमंती दिसली.
सह्याद्रीची प्रमुख रांग, गोदावरी, तापीचे लाभलेले खोरे यामुळे जिल्हा समृद्ध झाला आहे. धरणांची संख्याही नाशिकमध्ये जास्त आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे जिल्ह्यात वन्यजीवांचे वास्तव्य व त्यांची जैवविविधताही चांगली आहे. निफाड, दिंडोरी, सटाणा, सिन्नर, इगतपुरी तालुक्यांत बिबट्यांचा वावर आहे. येवल्यात काळवीट, हरणांची मोठी संख्या आहे.
भरलेली धरणे व कालवे वाहते असल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई अपवादात्मक परिसर वगळता अन्यत्र जाणवत नाही. पर्जन्यमानही
चांगले आहे. एकूण १५ हजार ५३० चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी ३५० चौरस किलोमीटर क्षेत्रावर वनांचे अस्तित्व आहे.

वानरांचे अस्तित्व

त्र्यंबकेश्वर तालुक्यात तरस, कोल्हे, वानर, माकडांसह बिबट्यांचा अधिवास आढळतो. इगतपुरी तालुका वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासासाठी ओळखला जातो. येथे बिबट्या, साळिंदर, जंगली ससे, उदमांजर, रानमांजर, लांडगे आढळतात. ंंंं

Web Title: Nashik Wildlife 'Corridor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.