पुण्याच्या घटनेतून नाशिकलाही घ्यावा लागेल धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:12+5:302020-12-11T04:41:12+5:30

पुण्याच्या कोथरुड भागात एक रानगवा आला अन‌् पुणेकरांनी त्याला बघण्यासाठी तोबा गर्दी केली. त्या अजस्त्र वन्यजीवानेदेखील माणसांच्या गर्दीपुढे हात ...

Nashik will also have to learn a lesson from the Pune incident | पुण्याच्या घटनेतून नाशिकलाही घ्यावा लागेल धडा

पुण्याच्या घटनेतून नाशिकलाही घ्यावा लागेल धडा

Next

पुण्याच्या कोथरुड भागात एक रानगवा आला अन‌् पुणेकरांनी त्याला बघण्यासाठी तोबा गर्दी केली. त्या अजस्त्र वन्यजीवानेदेखील माणसांच्या गर्दीपुढे हात टेकत आपले प्राण सोडले. या घटनेनंतर नागरिकांसह पुणे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, वनविभाग अशा सर्वच यंत्रणांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नेमके कोण कोठे चुकले? यावर चर्चा होत आहे.

या घटनेनंतर नाशकातदेखील बिबट्या मानवी वस्तीत अनेकदा शिरकाव करतो, आतापर्यंत वनविभागाने अथक परिश्रमाने बिबटे सुरक्षित रेस्क्यू केले आहेच; मात्र मागील वर्षी २५ जानेवारीचा दिवस असो किंवा १७ फेब्रुवारीचा दिवस असो, या दोन्ही घटनांच्यावेळी सावरकरनगरमध्ये बिबट्या रेस्क्यू करताना चमको लोकप्रतिनीधींपासून तर मोबाइलद्वारे छबी टिपण्यासाठी आटापिटा करणाऱ्या तरुणाईपर्यंत सर्वांचाच सामना वनविभागाला करावा लागला होता. शेकडोंच्या संख्येने उसळलेल्या गर्दीच्या गोंगाटामुळे बिबट्याही कमालीचा बिथरला होता आणि तो तितकाच आक्रमक होऊन या बंगल्याच्या कुंपणावरून त्या बंगल्याच्या कुंपणात उड्या घेत होता. जोपर्यंत बिबट्या एका ठिकाणी शांत होऊन बसत नाही, तोपर्यंत त्याला भुलीचे इंजेक्शन सोडणेदेखील शक्य नव्हते; मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे तो आडोशालाही शांत बसत नव्हता. परिणामी बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी वनविभागाला तीन ते चार तास वनविभागाला युध्दपातळीवर प्रयत्न करावे लागले होते.

---इन्फो---

वनविभागाकडे अपुरी सुरक्षा साधने

पश्चिम वनविभागाकडे यावेळी असलेली सुरक्षा साधने, रेस्क्युची सामग्री अपुऱ्या स्वरूपात असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. वनअधिकारी, कर्मचाऱ्यांकडे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी सुरक्षासाधनेदेखील यावेळी नव्हती. त्यामुळेच वनरक्षक व वनपालाला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी व्हावे लागले होते. सुदैवाने त्यांच्यावर आलेला बाका प्रसंग टळला.

---इन्फो--

बघ्यांची तोबा गर्दी अन‌् पोालीस बिबट्याच्यामागे

वनविभागाचे रेस्क्यु पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याकरिता बघ्यांची गर्दीवर नियंत्रण मिळवून परिसर निर्मनुष्य कसा करता येईल, याकडे लक्ष देण्याऐवजी बिबट्यामागे पोलीस कर्मचारी धावताना तेव्हा दिसून आले होते. यामुळे सावरकरनगरच्या प्रत्येक गल्लीबोळात गोंगाट अन‌् उंच इमारतींवरून दगडही काही महाभागांकडून बिबट्याच्या दिशेने भिरकावले गेले होते.

---

फोटो आर वर १०सावरकरनगर/१/२/३

Web Title: Nashik will also have to learn a lesson from the Pune incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.