राज्य पातळीवर नाशिकची परंपरा कायम राहील: नितीन बच्छाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:17 AM2019-01-20T01:17:54+5:302019-01-20T01:19:12+5:30
गेल्या चार वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची ५ ते ७ उपकरणे सतत राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातात. तीच परंपरा यावर्षीही कायम राहील, असा आशावाद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी व्यक्त केला.
सिन्नर : गेल्या चार वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची ५ ते ७ उपकरणे सतत राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातात. तीच परंपरा यावर्षीही कायम राहील, असा आशावाद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी व्यक्त केला.
सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्रवरा शिक्षणसंस्थेचे संचालक किशोर नावंदळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. त्यावेळी बच्छाव बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा विज्ञान संघाचे अध्यापक डी. यू. अहिरे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एस. बी. देशमुख, साहेबराव कुटे, पुरुषोत्तम रकिबे, जिल्हा विज्ञान समन्वयक व उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील, के. डी. मोरे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या तीनदिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्रवरा शिक्षणसंस्थेने बालवैज्ञानिक सोयीसाठी त्याच्याकडील तंत्रज्ञान बससेवा उपलब्ध करून दिली होती. सदर जिल्हा विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विज्ञान प्रदर्शनातील निकाल पुढीलप्रमाणे- प्राथमिक गट- प्रथम- धामणगाव माध्यमिक विद्यालय (आर्किटेक्ट लेझर), द्वितीय- जनता विद्यालय, नायगाव (बहुउद्देशीय कृषी अवजारे), तृतीय- वाघदळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (अॅक्युरेट पेट्रोलपंप), उत्तेजनार्थ बक्षिसे - वाघ गुरुजी बालशिक्षण विद्यालय, नाशिक (स्वच्छ भारत तंत्रज्ञान मुक्त भारत), नाशिक आदिवासी विभागातील पारितोषिक प्रथम - आश्रमशाळा बाभुळणे (कीटक आळी नियंत्रण सापळा), द्वितीय- जिल्हा परिषद शाळा दौडट (स्वयंचिलत रेल्वे स्टेशन), तृतीय- जिल्हा परिषद शाळा, बुबळी (सेंद्रिय शेती आणि फायदे).
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य के. टी. व्हे. रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. एस. बी. देशमुख यांनी आभार मानले. यावेळी कैलास तांबे, सुनील भामरे, वाय आर. पवार, विनीत पवार, सचिन शेवाळ, एस. टी. पांगारकर, संग्राम करंजकर, कल्पेश चव्हाण, आर. टी. गिरी, यू. डी. पाटील, गणेश शिंदे, किशोर शेडगे, चारुशीला भंगाळे, संजीव पाटील, विजय तांबे, दिनेश पवार आदी उपस्थित होते.
हे आहेत विविध गटांतील विजेते
माध्यमिक विभाग
प्रथम- रचना विद्यालय, नाशिक (सेव्ह लाईफ) द्वितीय - डॉ. सुभाष गुजर हायस्कूल, देवळाली (गीव्ह बॉटल, टेक बॉटल), तृतीय- स. अ. तू. र. य. एस. आश्रमशाळा ब्राह्मणगाव, ता. बागलाण (अग्निसूचक यंत्र). उत्तेजनार्थ बक्षीस- माध्यमिक आश्रमशाळा वाघेरे (सहज सोपी गुणाकार पद्धत).
आदिवासी विभाग
प्रथम- माध्यमिक शाळा चिंचोला (रेल्वे सुरेक्षा आणि विजेची बचत), व्दितीय- माध्यमिक विद्यालय, पिंपळद (सौरऊर्जा आधारित बहुद्देशीय यंत्र), तृतीय- आदर्श माध्यमिक विद्यालय, आसुंदी (बहुद्देशीय यंत्र).