महिलांच्या कला विकासासाठी झटणारी  नाशिक महिला महारांगोळी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:27 AM2018-10-18T00:27:56+5:302018-10-18T00:28:14+5:30

नववर्ष स्वागत यात्रा समिती अंतर्गत नाशिक महिला महारांगोळी विभाग गत तीन वर्षांपासून रांगोळी व इतर अनेक उपक्रमांद्वारे महिलांच्या कला ...

 Nashik Women's Maharo-Bangali Department is trying to develop women's art | महिलांच्या कला विकासासाठी झटणारी  नाशिक महिला महारांगोळी विभाग

महिलांच्या कला विकासासाठी झटणारी  नाशिक महिला महारांगोळी विभाग

googlenewsNext

नववर्ष स्वागत यात्रा समिती अंतर्गत नाशिक महिला महारांगोळी विभाग गत तीन वर्षांपासून रांगोळी व इतर अनेक उपक्रमांद्वारे महिलांच्या कला संवर्धनासाठी परिश्रम घेत आहे. पहिल्या वर्षी केवळ ५० ते ६० महिला सदस्य असणाऱ्या या ग्रुपला आज ५००हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. वर्षभरात विविध सण, जयंती, उत्सवांना रांगोळी सेवा देण्याचे काम ग्रुपमधील सदस्य करत आहेत. ग्रुपमध्ये नव्याने सदस्य होणाºया महिलांना बिंदूपासून मोठी रांगोळी रेखाटण्यापर्यंत सविस्तर प्रशिक्षण दिले जाते. ग्रुपमधील महिलांना ऐक्य, समता, बंधूता, तप्तरता ही मूल्ये काम करताना नकळतपणे शिकायला मिळतात. यातून त्यांची कला विकसित होतेच पण त्या स्वतंत्रपणे काम करून अर्थार्जनही करू शकतात. ग्रुपने मागील नवरात्रात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या अंगणात आकर्षक महारांगोळी रेखाटण्यात आली होती. नऊ दिवस हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीत रविवार कारंजावरील व्यापारी मंच यांच्या विनंतीनुसार वही पूजनाची मोठी आणि सुरेख रांगोळी रेखाटण्यात आली होती. पंढरपूर यात्रेसाठी पंढरपूरला जाऊन आलेल्या शेगावच्या पालखीचे स्वागत शेगाव येथे या ग्रुपने रेखाटलेल्या रांगोळीने केले जाते. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या ग्रुपमधील सदस्यांचे एकमेकींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. ग्रुपमध्ये निरनिराळ्या कार्यशाळा, प्रशिक्षण, स्रेहसंमेलन आयोजित केले जाते. पाडव्याच्या दिवशी गंगेवर तसेच शहरात ८ ते १० ठिंकाणी महारांगोळी रेखाटली जाते. याशिवाय त्रिपुरी पौर्णिमा, महावीर जयंती, गणेशोत्सव, रामनवमी, गोकुळाष्टमी, दिवाळी, दसरा, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा सर्वच सण-उत्सवांना रांगोळीसेवा दिली जाते. महिलांमध्ये कलेचा विकास कसा होईल, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. ग्रुपमधील सदस्यांना विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे सूचना पोहोचविल्या जातात. कार्यक्रमांची आगाऊ माहिती दिली जाते.
गु्रपमध्ये आसावरी धर्माधिकारी, वीणा गायधनी, भारती सोनवणे, अमी छेडा, मयना रुईकर, सुचिता हुदलीकर, मंजुषा नेरकर, अनुराधा शेटे, प्राची परदेशी आदी कार्यकर्त्या सक्रिय सहभाग देत आहेत.

Web Title:  Nashik Women's Maharo-Bangali Department is trying to develop women's art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.