कि क बॉक्सिंग स्पर्धेत नाशिकला तीन सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 05:38 PM2019-04-03T17:38:47+5:302019-04-03T17:38:53+5:30

ओझर (वार्ताहर)वाको इंडिया यांच्या वतीने आणि अमॅच्युर स्पोर्ट्स किकबॉक्सींग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय किकबॉक्सींग फेडरेशन चषक २०१९ या स्पर्धा बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली. नासिक जिल्ह्यास ३ सुवर्ण, ४ रौप्य, तसेच ३ कास्य पदके मिळाली. या स्पर्धेत देशातील २७ राज्यांमधील संघ सहभागी झाले होते.

 Nashik won three gold in the Boxing Championship | कि क बॉक्सिंग स्पर्धेत नाशिकला तीन सुवर्ण

कि क बॉक्सिंग स्पर्धेत नाशिकला तीन सुवर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देया राष्ट्रीय स्पर्धेत नासिक जिल्ह्यातिल खेळाडू सरोज निशाद याने फुल कॉन्टँक्ट -५५ किलो वजनी गटात रौप्य पदकाची प्राप्ती केली.

ओझर (वार्ताहर)वाको इंडिया यांच्या वतीने आणि अमॅच्युर स्पोर्ट्स किकबॉक्सींग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय किकबॉक्सींग फेडरेशन चषक २०१९ या स्पर्धा बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली. नासिक जिल्ह्यास ३ सुवर्ण, ४ रौप्य, तसेच ३ कास्य पदके मिळाली. या स्पर्धेत देशातील २७ राज्यांमधील संघ सहभागी झाले होते. 
प्रथमच पुण्यातील अमॅच्युर स्पोर्ट्स किकबॉक्सींग असोसिएशन महाराष्ट्र या संघटने या स्पर्धा या वर्ल्ड असोसिएशन आॅफ किकबॉक्सींग आॅर्गनायझेशन नियमावलीनुसार घेण्यात आली आहे. त्यामध्ये पॉइंट फाईट, लाईट कॉन्टँक्ट, किक लाईट, फुल कॉन्टँक्ट, लो-किक, के-वन आ िण म्यूजिकल फॉर्मस आदि क्रि डा प्रकारांचा समावेश होता. या राष्ट्रीय स्पर्धेत नासिक जिल्ह्यातिल खेळाडू सरोज निशाद याने फुल कॉन्टँक्ट -५५ किलो वजनी गटात रौप्य पदकाची प्राप्ती केली. मुलींच्या गटात रक्षा मराठे हिने लाईट कॉन्टँक्ट आणि किक लाईट -४० किलो वजनी गटात २ सुवर्ण पदक प्राप्त केले, विशाखा शिंदे हिने लाईट कॉन्टँक्ट आणि किक लाईट - १ सुवर्ण, १ रौप्य पदक प्राप्त केले, गुंजन शिंदे हिने लाईट कॉन्टँक्ट आणि किक लाईट -५५ वजनीगटात १ रौप्य, १कास्य पदक प्राप्त केले, अपुर्वा थोरात हिने लाईट कॉन्टँक्ट
-२८ वजनी गटात १रौप्य पदक प्राप्त केले, स्वराली शिंदे हिने लाईट कॉन्टँक्ट आणि किक लाईट २ कास्य पदक प्राप्त केले तसेच निलेश जंजाळे यानी फुल कॉन्टँक्ट सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांना महेश कदम आणि रक्षा मराठे यानी मार्गदर्शन केले.(03ओझर किकबॉक्सींग)

Web Title:  Nashik won three gold in the Boxing Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.