कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोटार फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:29 AM2018-01-05T01:29:31+5:302018-01-05T01:30:15+5:30
नाशिक : कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकचे कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांना बसला. बुधवारी (दि.३) साताºयात माजी नगरसेवक मंडाले यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली.
नाशिक : कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकचे कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांना बसला. बुधवारी (दि.३) साताºयात माजी नगरसेवक मंडाले यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने सर्व पदाधिकारी हॉटेलमध्ये असल्याने बचावले.
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्टÑ बंदचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हा प्रकार घडला. राष्टÑवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने माजी खासदार देवीदास पिंगळे हे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे व कॉँग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले यांना बरोबर घेऊन सांत्वनासाठी गेले होते. पाटील यांच्याकडून निघाल्यानंतर ते तेथील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर ते बंगळुरू हायवेवरील हॉटेलमध्ये गेले आणि रूममधून बॅग घेण्यासाठी गेले असताना खाली घोषणाबाजी आणि दगडफेकीचे आवाज आल्याने ते खाली उतरले तेव्हा लक्ष्मण मंडाले यांच्या पार्किंंगमध्ये उभ्या असलेल्या मर्सिडीज कार (क्र. एमएच १५, ईएस १०० ) वर दगडफेक केल्याने नुकसान झाले होते. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दगडफेक करणाºयांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पिंगळे यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या घटनेनंतर पिंगळे हे विमानाने साताºयावरून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला दाखल झाले. उर्वरित पदाधिकारी मोटारीने नाशिकला परतले आहेत.