Nashik: लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, किरकोळ वादातून डोक्यात मारला लाकडी दांडुका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 02:13 PM2023-05-05T14:13:53+5:302023-05-05T14:14:33+5:30

Nashik News: कामटवाडे येथे गुरूवारी रात्री किरकोळ भांडणातुन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खुन केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी  हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Nashik: Younger brother killed elder brother, hit him on the head with a wooden stick over a petty dispute | Nashik: लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, किरकोळ वादातून डोक्यात मारला लाकडी दांडुका

Nashik: लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, किरकोळ वादातून डोक्यात मारला लाकडी दांडुका

googlenewsNext

- नरेंद्र दंडगव्हाळ 

नाशिक - कामटवाडे येथे गुरूवारी रात्री किरकोळ भांडणातुन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खुन केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी  हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कामटवाडा येथे  मयत सदाशिव दामू निकम (वय ५५ ) व आरोपी त्याचा भाऊ  हरि दामू निकम ( वय ५० ) हे शेजारी राहतात. गुरुवारी( दि.४) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सदाशिव दामू निकम हे घरासमोर रस्त्यावर बोलत करत होते. या वेळी आरोपी त्याचा भाऊ  हरि दामू निकम  हा सदाशिव जवळ आला व मला शिविगाळ का करतो या वरून वाद झाल्यानंतर त्याने सदाशिव याच्या डोक्यात लाकडी दांडुका डोक्यात मारला. यात सदाशिव हे गंभिर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .

रुग्णालयात उपचार सुरू असताना सदाशिव यांना डॉक्टरांनी  मयत घोषित केले. या प्रकरणात बायडी कैलास सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी हरि दामू निकम याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत . मयत सदाशिव निकम याच्या पश्यात तीन मुले व दोन मुली परिवार आहे .

Web Title: Nashik: Younger brother killed elder brother, hit him on the head with a wooden stick over a petty dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.