नाशिकमधील तरुणांचे राज्यातील हिंसाचाराच्या घटनांबाबत मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:14 AM2020-02-17T01:14:15+5:302020-02-17T01:14:48+5:30
शहरातील विविध संघटनांमध्ये कार्यरत तरुणांनी रविवारी (दि.१६) येथील प्रमोद महाजन उद्यानात एकत्र येत ‘वन बिलियन रायझिंग’ (ओबीएन) संकल्पना समजावून घेत राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर विचारमंथन केले. हिंसाचाराच्या घटनांमुळे तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता यानिमित्ताने व्यक्त झाली.
नाशिक : शहरातील विविध संघटनांमध्ये कार्यरत तरुणांनी रविवारी (दि.१६) येथील प्रमोद महाजन उद्यानात एकत्र येत ‘वन बिलियन रायझिंग’ (ओबीएन) संकल्पना समजावून घेत राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर विचारमंथन केले. हिंसाचाराच्या घटनांमुळे तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता यानिमित्ताने व्यक्त झाली.
सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता त्यावर मुक्त चर्चा होणे गरजेचे आहे. वन बिलियन रायझिंगच्या माध्यमातून या विषयावर मार्ग काढण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींची आणि तरुणांची बैठक झाली. यात अत्याचाराच्या घटनांबाबत साधकबाधक चर्चा झाली. एकत्र येऊन हिंसाचाराच्या विरोधात काही तरी उपक्रम करावा, असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. यासंदर्भात अनेक आंदोलन, कॅन्डल मार्च होतात पण त्याचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येते. याची सामाजिक बाजूही समजावून घेणे आवश्यक आहे. पुरुषप्रधान संस्कृती, जात धर्मावर आधारित विषमता, चित्रपटांचा प्रभाव या बाबीही समजावून घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नाशिक ओबीएन ग्रुपच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
हिंसेच्या विरोधात १०० कोटी
१४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाइन डे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. याचदिवशी २०१२ मध्ये ईव्ह एक्सलर या एका अमेरिकन कार्यकर्तीने जगभरात महिलांवर होणाºया हिंसेला विरोध करत प्रेमाचा संदेश देण्यासाठी ‘वन बिलियन रायझिंग’चे आवाहन केले. वन बिलियन रायझिंग म्हणजे हिंसेच्या विरोधात १०० कोटी. संयुक्त राष्टÑसंघाच्या अभ्यासानुसार जगभरात प्रत्येक तीनपैकी एक स्री हिंसा सहन करते, जगभरात १०० कोटी महिला हिंसा सहन करतात.