कसारा घाटातील अपघातात नाशिकच्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 03:00 PM2023-09-17T15:00:47+5:302023-09-17T15:00:59+5:30
पहाटे 3 च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात अपघात ग्रस्त वाहणातील तरुणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नाशिक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
शाम धुमाळ
नाशिक : पहाटे 3 च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात अपघात ग्रस्त वाहणातील तरुणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नाशिक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिक येथील उद्योजक तरुण पवन रामचंद्र मोरे वय 47 व त्यांचे मित्र नरेंद्र पाटील हे आपले काम आटपून मुबई हून नाशिक कडे जात असताना कसारा घाटातील नागमोडी वळणा वर गाडी चालवत असलेले नरेंद्र पाटील यांच्या कडून गाडी वरील ताबा सुटला व गाडी घाटातील नाल्यात अडकली गाडीचे चालकाच्या बाजूकडील भाग नाल्यात अडकल्याचे लक्षात येताच चालकाच्या बाजूला बसलेले पवन मोरे यांनी गाडीच्या खाली उतरून गाडी काढण्यासाठी काही प्रयत्न करता येईल का याची खातर जमा केली.
अशातच पुन्हा गाडीत बसण्यासाठी वळत असतानाच रात्रीच्या अंधारात व धुक्यात एका अज्ञात वाहनाने आपघातग्रस्त गाडीला धडक देत गाडीत बसण्यासाठी निघालेल्या पवन मोरे यांना जोरदार धडक दिली. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे पवन मोरे हे जागीच मयत झाले तर त्यांचे सहकारी मित्र नरेंद्र पाटील यांना सुदैवाने काहीही दुखपत झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस, महामार्ग पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले व मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.