Nashik: ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन
By नामदेव भोर | Updated: June 7, 2023 20:35 IST2023-06-07T20:35:17+5:302023-06-07T20:35:39+5:30
Nashik: नाशिकरोड येथील कैलास लॉजमधी खोलीत ठाणे येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्या घटना घडली असून या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Nashik: ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन
- नामदेव भोर
नाशिक : नाशिकरोड येथील कैलास लॉजमधी खोलीत ठाणे येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्या घटना घडली असून या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे पूर्व येथील आदर्श चाळ, भोलानगर येथे राहणाऱ्या सिध्देश सुरेंद्र कदम (२५) या युवकाने नाशिकरोडच्या आंबेडकर रोडवरील कैलास लॉजमध्ये राहण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास येथील नोकरदाराने अनेक वेळा दरवाजा वाजवूनही सिध्देश दरवाज उघडत नव्हता. नोकरांनी दरवाजा लाथा मारून दरवाजा उघडला असता छताच्या फॅनला दोरी बांधून सिध्देशने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.