नाशिकमधील १६४ भिकाऱ्यांची पुनर्वसनासाठी रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:26 PM2018-05-07T18:26:21+5:302018-05-07T18:26:21+5:30
नाशिक : शहरातील उड्डाणपूल, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यावर थांबून वाहनधारक तसेच नागरिकांकडून भीक मागणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती केली होती़ या विनंतीनुसार शहर पोलीस पोलिस आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि़७)शहरात भिक्षेकरी मुक्त अभियान राबविण्यात आले़ पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीतून १६५ भिक्षेक-यांना पकडून न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदनगर, पुणे, नाशिक, मनमाड व नाशिक पुर्नवसनासाठी रवाना केले़

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी भिक्षा प्रतिबंधक अधिनियम १९५९ अन्वये शहरातील विविध सिग्नल्स उड्डाणपुल, रस्ते या ठिकाणी सोमवारी विशेष मोहिम राबविली़ या मोहिमेत शहरातील १६४ भिक्षेक-यांना पकडण्यात आले़ त्यामध्ये ५५ पुरुष, ४४ महीला, ३९ मुले व २६ मुलींचा समावेश आहे़ पोलिसांनी या सर्वांना पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये ठेवले होते़ या ठिकाणी या सर्वांना अंघोळ, त्यांचे केशकर्तन, नवीन कपडे व जेवन देण्यात आले़ यानंतर या सर्व भिका-यांना जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यवान डोके यांच्यासमोर हजर करण्यात आले़
पोलिसांनी पकडलेल्या या भिका-यांची विभागणी करून अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील गर्व्हमेंट मेल रिसिंग सेंटर, पुणे येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र तसेच अनुरक्षण संघटना संचलीत मुलांचे निरीक्षक गृह मनमाड व मालेगाव या ठिकाणी पाठविण्यात आले़ शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा व सत्र न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण, शहर पोलीस आयुक्तालय, महिला व बालकल्याण विभाग,जिल्हा रुग्णालय, तसेच बॉर्न टू हेल्प फाऊंडेशन, सुख- समृद्धी, सक्षम, चाकं शिक्षणाची या सेवाभावी संस्थाचा समावेश होता़