३७८ जवानांची तुकडी देशसेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 07:14 PM2019-06-20T19:14:27+5:302019-06-20T19:15:27+5:30
नाशिक : आशिायातील सर्वात मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पुर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ ...
नाशिक: आशिायातील सर्वात मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पुर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करून ‘तोफची’ झालेले जवान देशसेवेची शपथ घेऊन देशसेवेत दाखल झाले. या प्रशिक्षणात उत्कृष्ठ टेक्निकल असिस्टंट म्हणून अविनाश कुमार हा सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी ठरला. तर उत्कृष्ठ तोफचीचा पुरसस्कार अमन राणा याने पटकाविला.
नाशिकरोड आर्टिलरी तोफखाना सेंटर येथे या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लेफ्टनंट कर्नल आणि आर्टिलरी रेजिमेंट आर्मीचे संचालक पी.के. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत जवानांनी शानदार संचलन करीत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. यावेळी श्रीवास्तव म्हणाले.
उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी:-
अविनाशकुमार (टेक्निकल असिस्टंट)
उत्कृष्ठ तोफची (अमन राणा)
उत्कृष्ठ आॅपरेटर (राहुल नवले)
उत्कृष्ठ टेक्निकल असिस्टंट (अविनाश कुमार)
उत्कृष्ठ ड्रायव्हर मेकिनिकल ट्रान्सपोर्ट (निर्मल हमाल)
उत्कृष्ठ फिजीकल टेस्ट (रणधीरकुमार शर्मा)
उत्कृष्ठ वेपन ट्रेनिंग (तोफची संदीप सिंग)
बेस्ट इन ड्रील (गौरव चव्हाण)
बेस्ट टीडीएन (मारुती बाळप्पा पुजारी)