एकात्मतेचा संदेश देणारी दौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 07:10 PM2019-10-31T19:10:50+5:302019-10-31T19:13:13+5:30
नाशिक : सरदर वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी नाशिककरांनी एकात्मकतेचा संदेश देत शहरातून एकता ...
नाशिक: सरदर वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी नाशिककरांनी एकात्मकतेचा संदेश देत शहरातून एकता रॅली काढण्यात आली. राष्टÑीय एकात्मकतेचा संदेश देण्याबरोबरच राष्टÑीय संकल्प दिवसाचे औचित्य साधून पहाटे या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एकता दौड मध्ये असंख्य नाशिककर देखील सहभागी झाले होते. पोलीस परेड ग्राऊंड येथून एकता रॅली रॅलीला सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी देशभक्तीपरे गीते आणि पोलीस बॅँन्ड पथकाच्या धूनच्या माध्यमातून एकात्मकतेचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक पोलीस क्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक छोरींग दोरजे, पोलीस अधिक्षक आरती सिंग, जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी उपस्थितांना एकतेची शपथ दिली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून उपस्थित अधिकाऱ्यांना स्मृतिचन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी करणसिंग यांनी वॉर्मसेशन घेतले. यावेळी सहभागी झालेल्या नाशिककरांनी गीतसंगीताच्या तालावर वॉर्मअप पुर्ण केले. सुमुखी अथनी आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या गणेशवंदना सादर केली. ’साथ चले हम, साथ रहे हम, मंजील एक हमारी’ असा एकतेचा संदेश यावेळी नृत्याच्या माध्यमातून देण्यात आला. शहरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
पोलीस परेड ग्राउंड, पोलीस वसाहतमार्गे गंगापूररोड, गंगापूर नाका येथून कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड मार्गे पुन्हा पोलीस परेड मैदान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासानकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सुत्रसंचालन आरजे ऋषभ याने केले.