आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 06:33 PM2019-02-20T18:33:05+5:302019-02-20T18:34:29+5:30

नाशिक : आदिवासी आश्रमशाळा आस्थापनेवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘गट क’ संवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळालेल्या संधीनुसार राज्यातील २९ प्रकल्पांमध्ये ...

nashik,admission,adiwasi,aosary,employees | आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल

आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल

googlenewsNext


नाशिक: आदिवासी आश्रमशाळा आस्थापनेवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘गट क’ संवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळालेल्या संधीनुसार राज्यातील २९ प्रकल्पांमध्ये सुमारे ३०० रोजंदारीवरील कर्मचाºयांनी भरती परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केल्याची माहिती असून काही तांत्रिक अडचणी वगळता सर्वत्र अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पडली. आदिवासी विकास विभागाने परीक्षेपासून वंचित रोजंदारीवरील कर्मचाºयांना अर्ज करण्यासाठी एक दिवसाची विशेष मोहिम राबविली. त्यानुसार २० एप्रिल २०१६ पर्यंत कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत.
आदिवासी आश्रमशाळा कर्मचाºयांनी शासनाच्या भरतीप्रक्रियेला विरोध करीत नाशिकमधील भरती परीक्षाच बंद पाडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशाी मुंबईत झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ केला आहे. राज्यातीलप्रत्येक प्रकल्प कार्यालयात परीक्षेपासून वंचित कर्मचाºयांचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. हे अर्ज केवळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी असले तर उर्वरित संवर्गातील उमेदवारांना नोकरीत संरक्षण मिळणार आहे.
आंदोलनकर्ते आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेनुसार आता शिक्षक आणि शिक्षकेतर रोजंदारी कर्मचाºयांचे परीक्षेसाठीचे अर्ज भरून घेण्यात आले असून त्यांना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांची लागलीच परीक्षा होणार आहे. सुमारे ३०० कर्मचाºयांना परीक्षेची संधी मिळालेली आहे. उर्वरित इतर संवर्गातील रोजंदारी आणि तासिकावरील सुमारे १८०० कर्मचाºयांच्या देखील नोकरीची हमी देण्यात आल्यामुळे रोजंदारी कर्मचारी संतुष्ट आहे. परंतु जो पर्यंत प्रत्यक्षात कारवाई होत नाही तोपर्यत या विषयी स्पष्ट सांगण्यास अनेकांनी नकार दिलेला आहे.
रोजंदारी कर्मचºयांना गट क संवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या आदिवासी विकास विभागाने आयोजित केलेल्या परीक्षेसेला बसण्याची संधी मिळावी यासाठी २० तारखेला प्रकल्प कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पाचारण केले होते. त्यानुसार रोजंदारीवरील कर्मचाºयांनी या संधीचा लाभ घेत अर्ज दाखल केले.

Web Title: nashik,admission,adiwasi,aosary,employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.