एअर डेक्कनचा पॉझ : नाशिकचा कॉमन मॅन पुन्हा एसटीनेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:16 PM2018-03-20T18:16:45+5:302018-03-20T18:18:03+5:30

नाशिकच्या विमानतळावरून सुरू झालेली मुंबई आणि पुण्याची विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने आठवडाभरासाठी स्थगित केली असून, त्यामुळे ‘कॉमन मॅन’ला पुन्हा महामंडळाच्या एसटी बसकडे धाव घ्यावी लागणार आहे. तांत्रिक कारणाचे निमित्त पुढे करून ही सेवा स्थगित करण्यात आली असली तरी मुळातच ही सेवा रखडत सुरू असल्याने कंपनीचे फावले असल्याचे सांगितले जात आहे.

Nashik,Air,Deccan,air,service,stop | एअर डेक्कनचा पॉझ : नाशिकचा कॉमन मॅन पुन्हा एसटीनेच!

एअर डेक्कनचा पॉझ : नाशिकचा कॉमन मॅन पुन्हा एसटीनेच!

googlenewsNext
ठळक मुद्दे तांत्रिक कारण: २७ मार्च पर्यंत मुंबई- पुणे सेवा बंद

नाशिक : नाशिकच्या विमानतळावरून सुरू झालेली मुंबई आणि पुण्याची विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने आठवडाभरासाठी स्थगित केली असून, त्यामुळे ‘कॉमन मॅन’ला पुन्हा महामंडळाच्या एसटी बसकडे धाव घ्यावी लागणार आहे. तांत्रिक कारणाचे निमित्त पुढे करून ही सेवा स्थगित करण्यात आली असली तरी मुळातच ही सेवा रखडत सुरू असल्याने कंपनीचे फावले असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकमधून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी काही व्यावसायिक आणि सामाजिक संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी प्रचंड पाठपुरावा केला होता. तथापि, अनेक वर्षे प्रयत्न करूनही ही सेवा सुरू होत नव्हती. नाशिकहून मुंबई आणि अन्य ठिकाणी अव्यवहार्य ठरत असलेली ही सेवा सिंहस्थ आणि त्यांनतरदेखील सुरू होऊ शकली नव्हती. तथापि, केंद्र सरकारने उड्डाण योजनेअंतर्गत अनुदानित आणि भरपाईच्या तरतुदी केल्यानंतर नाशिकमधून एअर डेक्कन कंपनीने सेवा सुरू केली.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही सेवा सुरू केल्यानंतरदेखील ही सेवा आठवडाभरासाठी बंद होती. त्यासाठी सुरुवातीला तिकीट विक्री झाल्याचे कारण सांगितले जात होते. नंतर मात्र, त्याचे सुस्पष्ट कारण देण्यात आले नव्हते. दरम्यान, आता ही सेवा सुरू असताना कंपनीने २७ तारखेपर्यंत तांत्रिक कारणामुळे सेवा स्थगित करण्यात आली असून, तसे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. या दिवसांचे कोणतेही बुकिंग घेतले जाणार नसल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. मुंबई, नाशिक आणि नाशिक-पुणे अशा दोन ठिकाणांबरोबरच हेच विमान जळगावला जा- ये करीत असते, ती सेवादेखील स्थगित करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी जून जुलै महिन्यात ही सेवा सुरू होणार असताना मुंबई विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने ही सेवा रखडली होती. त्यानंतर जीव्हीके कंपनीच्या विरोधात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयासमोर आंदोलन केल्यानंतर डिसेंबरपासून स्लॉट देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सेवा सुरू झाली, परंतु पहाटेचा स्लॉट देण्यात आला. त्यानंतर तो बदलून दुपारचा करण्यात आला. दुपारी मुंबईला विमानाने जाणे मुळातच गैरसोयीचे असल्याने मुंबईच्या जाणाऱ्या फे-या बहुतांशी रद्दच झाल्या आहेत. त्यातल्या त्यात नाशिक-पुणे विमानसेवा ब-यापैकी सुरू असली तरी वेळेतील बदल प्रवाशांना तापदायक ठरत आहे.

 

 

Web Title: Nashik,Air,Deccan,air,service,stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.