समूहातील चारही धरणे १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 05:32 PM2019-09-09T17:32:05+5:302019-09-09T17:32:45+5:30
नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु ...
नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीतून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरण समूहात गंगापूर धरणासह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश होतो. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांच्या तुलनेत सर्वांत मोठे धरण असून उर्वरित तीनही धरणे मध्यम प्रकल्पातील आहे. सद्यपरिस्थितीतही चारही धरणे शंभर टक्केभरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून, शेतीची कामेदेखील सुरू आहेत. मागील आठवड्यातच १०० टक्के झालेले धरण सलग दहा दिवसांनंतरही कायम असून, शनिवारपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विसर्ग अधिक वाढविण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.