शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 03:05 PM2019-08-05T15:05:03+5:302019-08-05T15:06:05+5:30
नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यानुसार सोमवारी शहर, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ...
नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यानुसार सोमवारी शहर, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शाळांना सुटी जाहिर करण्यात आली होती.
जिल्ह्यात सर्वदूर असलेल्या पावसामुळे धरणांच्या पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे धरणांमुळे सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय संततधार सुरूच असल्याने नदीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शाळेत जाणाºया विद्यार्थी आणि शालेय वाहनांना अडचण निर्माण होऊ नये किंवा पाण्याच अडकून पडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सुटीचे आदेश शैक्षणिक संस्थांना दिले होते. त्यानुसार सोमवारी सर्वत्र शाळा आणि महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती.
जिल्हाधिकाºयांनी शैक्षणिक संस्थांना सुटीचे आदेश दिले असले तरी शहरातील खासगी क्लासेस संचालकांनी देखील क्लासेस बंद ठेवले होते. शहरातील काही क्लासेस संचालकांनी सकाळी आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भ्रमणध्वनीवर लघू संदेश पाठवून क्लोसेसला सुटी असल्याचे जाहिर केले होते.
अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जाहिर करण्यात आलेल्या सुटीमुळे शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड सारख्या भागातील वर्दळ काहीशी कमी झाल्याचे दिसले. कॉलेजरोडवरही काहीसा सुनासुना जाणवत होता. कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, शरणपूररोड, पंडीत कॉलनी या भागात खासगी क्लोससेची संख्या मोठी आहे. सोमवारी खासगी क्लासेस देखील बंद असल्यामुळे या या मार्गावर दिसणारी तरुण-तरुणींची गर्दी ओसरी होती. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे खाद्यपदार्थ्यांचे दुकाने आणि स्टॉल्सही बंद ठेवण्यात आली होती.