दिंड्यांनी दुमदुमली नाशिकनगरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:36 AM2020-01-18T00:36:55+5:302020-01-18T01:09:50+5:30
: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नाशिकनगरी दुमदुमून गेली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माउली एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकरी आपापल्या दिंड्यांनी त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत आहे. परंपरेनुसार निर्धारित स्थानी अनेक दिंड्यांनी दुपारी आणि रात्री विसावा घेतला.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा येत्या सोमवारी (दि.२०) त्र्यंबकेश्वर येथे भरणार असून, त्यासाठी राज्यभरातून दिंड्या नाशिकमार्गे जात आहेत. शुक्रवारी (दि.१७) पालख्यांमधील संत-देवतांना रामकुंडावर गोदास्नान घालून मग दिंड्या मार्गस्थ झाल्या.
नाशिक : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नाशिकनगरी दुमदुमून गेली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माउली एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकरी आपापल्या दिंड्यांनी त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत आहे. परंपरेनुसार निर्धारित स्थानी अनेक दिंड्यांनी दुपारी आणि रात्री विसावा घेतला.
संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा यंदा सोमवारी (दि. २० जानेवारी) होणार असल्याने लांबच्या जिल्ह्यांतील दिंड्यांनी आगेकूच करण्यास प्रारंभ केला.
त्यानंतर जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, येवला अशा लांबच्या तालुक्यांमधील दिंड्यादेखील महानगराच्या विविध भागांमध्ये विसावल्या. त्र्यंबकेश्वरी भरणार असलेल्या या यात्रेसाठी त्र्यंबकेवर नगरपालिका तसेच निवृत्तिनाथ महाराज ट्रस्टच्या वतीनेदेखील विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सोमवारी यात्रोत्सव
पौष महिन्यातील षटतिला एकादशीला परंपरेप्रमाणे या यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात राज्यभरातून या वारीसाठी त्र्यंबकेश्वरला येत असतो. जिल्ह्यातील अनेक वारकरी तर सहकुटुंब या यात्रेत सहभागी होतात. नाशिक जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा यात्रोत्सव असून, महाराष्टÑासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधील भाविकदेखील यात्रेत सहभागी होतात.