डिझेल नसल्याने नाशिकच्या बसेसला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 07:59 PM2019-12-16T19:59:54+5:302019-12-16T20:01:07+5:30
नाशिक : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारे इंधन उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जाणाºया आणि ...
नाशिक : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारे इंधन उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जाणाºया आणि बाहेरगावाहून आलेल्या बसेसला ब्रेक लागला आहे. डिझेल नसल्याने सर्व बसेस डेपोतच उभ्या असून, चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्येदेखील तीव्र नाराजी आहे. दरम्यान, या प्रकरणी विभागीय कार्यालयात अधिकाºयांची तातडीने बैठक होऊन डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत सुमारे तासभर चर्चा सुरू होती.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील १३ डेपोंमधून जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर धावणाºया बसेसला सुमारे ५५ हजार लिटर डिझेल दररोज लागते. यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा भरणा तेल कंपन्यांना रोजच्या रोज करावा लागतो. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाºया महामंडळाकडून तेल कंपन्यांचे पुरेसे देयक अदा केले नसल्याने अपेक्षित डिझेल प्राप्त होत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून विभागातील बसेसला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. रविवारी दुपारनंतर डिझेल तुटवड्याची झळ बसू लागल्याने काही फेºया बंद करण्याची वेळ आली. तातडीची गरज म्हणून जिल्ह्यातील तीन डेपोंमधून प्रत्येकी ५० हजार लिटर्स डिझेल तातडीने मागविण्यात आले.
आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाºया महामंडळाच्या नाशिक विभागालादेखील गेल्या दोन दिवसांपासून झळ सोसावी लागत आहे. रविवारी दुपारनंतर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने काही मार्गांवरील बसेसच्या फेºया कमी करण्यात आल्या. सोमवारी मात्र संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली. बाहेरगावाहून आलेल्या बसेसदेखील डिझेल नसल्यामुळे नाशिकमध्येच अडकून पडल्या होत्या. जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांनादेखील डेपोतून थांबविण्यात आले. गाड्याच धावत नसल्यामुळे चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सारा प्रकार सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण बसयंत्रणा कोलमडून पडली होती.