एटीएमची अदलाबदल करून वृद्धाची ३५ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:47 PM2018-08-08T12:47:32+5:302018-08-08T12:48:32+5:30
नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धास मदत करणाऱ्या संश्यिताने एटीएम कार्डची अदला-बदल करून वृद्धाच्या खात्यातून परसपर ३५ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना सातपूरमधील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील एटीएममध्ये घडली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर स्वारबाबानगरमधील सोमेश्वर गल्लीतील रहिवासी बाबूराव गोपीनाथ चव्हाण (६५) हे मंगळवारी (दि़७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सातपूर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते़ त्यांनी पैसे काढण्यासाठी एका अनोळखी इसमाची मदत घेऊन त्याच्या समोरच एटीएमएचा पिनकोड टाकून पाच हजार रुपये काढले़ यानंतर संश्यिताने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलले व दुसरेच एटीम कार्ड चव्हाण यांना दिले़
यानंतर चव्हाण यांच्या एटीएमचा उपयोग करून त्यांच्या खात्यातून ३५ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली़ दरम्यान, अनोळखी माणसांची एटीएममध्ये मदत घेऊ नका अशा सूचना दिलेल्या असतानाही त्यांचे पालन होत नसल्याने अशा फसवणूकीच्या घटना घडत असतात़ शहरामध्ये यापुर्वीही अशा फसवणूकीच्या घटना घडलेल्या आहेत़