चालक वाहक पदासाठी ‘मध्यस्थांचे’ प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:13 PM2019-02-21T17:13:20+5:302019-02-21T17:14:11+5:30
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक पदासाठी येत्या रविवारी आॅफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधित उमेदवारांना ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक पदासाठी येत्या रविवारी आॅफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधित उमेदवारांना काही दलालांकडून नोकरीचे प्रलोभन दाखविले जात असल्याच्या तक्रारी महामंडळाला प्राप्त झाल्याने महामंडळाने याप्रकरणी उमेदवारांना सतर्क राहाण्याच्या सुचना पाठविल्या आहेत. काही मध्यस्थ उमेदवारांशी संपर्क करून त्यांना प्रलोभने दाखवित असल्याच्या तक्रारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महामंडळाने सतर्क राहाण्याच्या सुचना परीक्षा यंत्रणेला देखील दिल्या आहेत.
चालक तथा वाहकदाची आॅफलाईन परीक्षा येत्या २४ रोजी घेण्यात येणार आहे. सदर भरतीप्रक्रियेबददल व आॅफलाईन परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून उमेदवारांना निवड करून देण्याचे प्रलोभन दाखविले जात आहे. अशा प्रकारच्या प्रलोभनामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक पालकांनी देखील या संदर्भात महामंडळाकडे विचारणा केली आहे. यातून निर्माण झालेला गोंधळ कमी करण्यासाठी महामंडळाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्या उमेदवारांशी कुणी बाहेरच्या व्यक्तीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत त्वरीत राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांशाी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची भरतीप्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी अशा प्रकारचे प्रलोभन देणाºयांविषयी स्थानिक पोलीस ठाणे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासंदर्भात आवाहन देखील करण्यात आले आहे.
सदरची परीक्षा केंद्र क्रमांक-१ सीएमसीएस महाविद्यालय, उदोजी मराठा बोर्डीेग कॅम्पस, केटीएचएम महाविद्यालय, गंगापूररोड, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय एकलहरे,ओढा या ठिकाणी सदर परीक्षा होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या कालावधीत परीक्षा होणार आहे.