नाशिकच्या पंचवटी परिसरात पुन्हा बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:57 PM2018-02-01T15:57:40+5:302018-02-01T16:01:39+5:30

पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात गेल्या पंधरवाडयापासून बिबट्याचा उसाच्या शेतात व मळे परिसरात संचार असल्याने नागरीकांंमध्ये भितीचे वातावरण आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे बोलले जात आहे.

nashik,bibtya,pancwati,leopard,forest | नाशिकच्या पंचवटी परिसरात पुन्हा बिबट्याचा संचार

नाशिकच्या पंचवटी परिसरात पुन्हा बिबट्याचा संचार

googlenewsNext
ठळक मुद्देगुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना घडले बिबटयाचे दर्शन

नाशिक :पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात गेल्या पंधरवाडयापासून बिबट्याचा उसाच्या शेतात व मळे परिसरात संचार असल्याने नागरीकांंमध्ये भितीचे वातावरण आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे बोलले जात आहे.
गंगावाडी परिसरात बिबट्याचा संचार असल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केली. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात यापूर्वीच एक पिंजरा लावण्यात आला असून आणखी एक पिंजरा लावण्याच येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
गंगावाडी परिसरात सकाळच्या सुमाराला शेतात काम करत असतांना सखाराम थाळकर व पप्पू तिडके यांना बिबट्याचे दर्शन घडले. त्यांनी तत्काळ जवळ राहाणाºया पंडीत तिडके यांना याबाबत कळविले. तिडके यांनी वनविभागाला संपर्क साधला त्यानंतर वनविभागाचे वनपाल जी. एस. वाघ, उत्तम पाटील, आर. एम. सोनार, डी. पी. जगताप आदिंचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला मात्र उसाचे शेत व दाट झाडी असल्याने पथकाला माघारी फिरावे लागले. परिसरात बिबट्याचा संचार असल्याने वनविभागाकडून गुरूवारी सायंकाळी तत्काळ पिंजरा लावण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
--इन्फो--
लहान मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन
मखमलाबाद शिवारातील गंगावाडीत असलेल्या गामणे व बागड मळयात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याने मळे परिसरात राहाणाºया नागरीकांनी सुरिक्षतता म्हणून लहान मुलांना शेतात एकटे सोडू नये. बिबट्या लहान मुलांवर सर्वप्रथम हल्ला करीत असल्याने मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

Web Title: nashik,bibtya,pancwati,leopard,forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.