महागड्या बुलेट चोरणाऱ्या टोळक्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:38 PM2018-05-08T22:38:13+5:302018-05-08T22:38:13+5:30
नाशिक : शहरातील विविध ठिकाणांहून महागड्या बुलेट दुचाकींची चोरी करणाºया त्रिकुटास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़ प्रदिप कासार (रा. शेवगे दारणा, ता. नाशिक), बाळासाहेब कासार (रा. शेवगे दारणा) व वैभव ढेरींगे (रा. लहवीत, ता. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांनी नावे असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीच्या तीन बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरातून महागड्या बुलेट दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याने या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते़ शहर गुन्हे शाखेतील युनिट दोनच्या पथकातील पोलीस शिपाई गणेश सानप यांना या त्रिकुटाबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरिक्षक गंगाधर देवडे, विजय लोंढे, पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र जाधव, कर्मचारी योगेश सानप, बाळा नांद्रे, देवकिसन गायकर, विजय पगारे, रमेश घडवजे , संजय ताजने यांनी सापळा रचून संशयीतांना शेवगे दारणा तसेच लहवीत येथून अटक केली.
पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे शहरातील फरासखाना, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथूून चोरी केलेल्या साडेतीन लाख रुपये किंमतीच्या तीन बुलेट चोरल्याची कबुली दिली़ हे तिघेही सराईत चोरटे असून त्यांच्याकडून दुचाकीचोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या टोळीचा सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत़