दुपारनंतर नाशिक-पुणे बसेस ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:17 PM2018-07-30T22:17:08+5:302018-07-30T22:21:08+5:30

nashik,bus,shivneri,after,pune,jam | दुपारनंतर नाशिक-पुणे बसेस ठप्प

दुपारनंतर नाशिक-पुणे बसेस ठप्प

Next
ठळक मुद्देचाकणमधील उद्रेक : पुण्यातील जाळपोळीने बससेवा विस्कळीतरात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही

 नाशिक : मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाने पुण्याहून निघणाºया आणि पुणेकडे जाणाºया सर्व प्रकारच्या सर्व मार्गांवरील बसेस आहे तेथेच थांबविल्या. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकली नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
मराठा क्रांती आंदोलनाला पुणे येथे हिंसक वळण लागल्याने मोठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे पुण्याहून नाशिकला येणाºया सर्व बसेस तत्काळ बंद करण्यात आल्या, तर नाशिकहून पुण्याला जाणाºया बसेसही ताबडतोब बंद करण्यात आल्या. नाशिकहून पुणे येथे दररोज सुमारे ६० शिवशाही बसेस ये-जा करतात. सकाळी २० बसेस पुण्याकडे रवाना झाल्यानंतर दुपारी या बसेस थांबविण्यात आल्या, तर पुण्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोहचलेल्या बसेस या पुण्यातच थांबविण्यात आल्या. अचानक संपूर्ण बससेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र गैरसोय झाली.
नाशिकहून पुण्याला जाणाºया प्रवाशांची मोठी गर्दी असते. नाशिक परिवहन महामंडळाला महसूल मिळवून देणारा सर्वाधिक नफ्याचा मार्ग म्हणून नाशिक-पुणे या मार्गाकडे पाहिले जाते. या मार्गावर सर्वाधिक शिवशाही बसेस सोडण्यात आल्या आहेत. तणावपूर्ण परिस्थितीमुळे सप्ताहातून दोनदा या मार्गावरील बसेस बंद काराव्या लागल्यामुळे महामंडळाला काही प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

Web Title: nashik,bus,shivneri,after,pune,jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.