आदिवासी संघटनेचा पायी मोर्चाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 06:10 PM2019-01-02T18:10:33+5:302019-01-02T18:11:42+5:30
नाशिक : आदिवासींच्या वनजमिनी, वडिलोपार्जित जमिनीबरोबरच आदिवासी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीने पायी मोर्चा ...
नाशिक : आदिवासींच्या वनजमिनी, वडिलोपार्जित जमिनीबरोबरच आदिवासी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीने पायी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. पंचवटीतील अमृतधाम येथून मोर्चाला प्रारंभ होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आदिवासींच्या वडिलोपार्जित जमिनी पुन्हा मिळाव्यात, पूर्वापार कसत असलेल्या जमिनी, इनाम, गाळपेरा या जमिनी आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करून स्वतंत्रपणे सातबारा उतारे देण्यात यावेत, गावरान तसेच पडीक सरकारी जमिनी सपाटीकरण करून भूमिहीन आदिवासींना प्रत्येकी अडीच एकर जमीन देण्यात यावी, आदिवासी दुर्गम भागातील आदिवासींना प्राथमिक सुविधा द्याव्यात, आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी संघटनेच्या अध्यक्षा लता बर्डे यांनी दिली. पंचवटीतील अमृतधाम येथून मोर्चा निघून शहरातील प्रमुख मार्गावरून गोल्फ क्लब मैदान गेटपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.