शस्त्रक्रियेसाठीच्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे कॅन्सर रुग्णांना जीवदान :पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:53 PM2018-07-22T22:53:20+5:302018-07-22T23:03:34+5:30
नाशिक : देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातही शक्य होत असून, त्यानुसार उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बराही होतो आहे़ कॅन्सरवरील उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाºया नवीन तंत्रज्ञानामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे प्रतिपादन न्यू दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे विभागप्रमुख पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत यांनी केले़

नाशिक सर्जिकल सोसायटी व असोसिएशन आॅफ आॅटोलरिंगोलॉजिस्टस आॅफ इंडिया, नाशिक कान, नाक, घसा तज्ज्ञ संघटना यांच्या सहकार्याने रविवारी (दि़२२) एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सर शस्त्रक्रियाविषयक वैद्यकीय परिषद ‘सिम्पोझिअम - २०१८’चे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पद्मश्री रावत यांनी जठर व गुद्द्वाराच्या कॅन्सरवरील उपचार व शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली़ त्यांनी सांगितले की, रुग्णास जठराच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अवघे चार-सहा महिनेच आयुष्य शिल्लक राहत होते तसेच गुदद्वाराच्या कॅन्सरमध्ये ते काढून टाकावे लागत होते़ मात्र, आता शस्त्रक्रियेद्वारे जठराचा कॅन्सर असलेल्या रुग्णाचे आयुष्य वाढले आहे़ तसेच गुदद्वाराचा कॅन्सर हा शस्त्रक्रियेने पूर्णपणे बरा होत असून, त्यासाठी गुदद्वार काढण्याची आवश्यकताही नाही़ देशात कॅन्सरवर सर्व उपचार होत असल्याचे रावत यांनी सांगितले़
या परिषदेमध्ये झालेल्या परिसंवादात डॉ़विनायक श्रीखंडे यांनी कॅन्सरच्या बदलत्या स्वरुपाबाबत माहिती दिली़ टाटा मेमोरीयल हॉस्पीटलचे विभागप्रमुख शैलेश श्रीखंडे यांनी पूर्वी जठराच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया खूप क्लिष्ट होती व रुग्णही घाबरत असे मात्र आता या शस्त्रक्रियेतील धोका कमी झाल्याचे सांगितले़ एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे कर्करोग शल्यचिकित्स्क डॉ़राज नगरकर यांनी महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी पूर्वी स्तन काढावा लागत असे, यामुळे महिलांमध्ये सौंदर्य बिघडल्याची मानसिकता होती़ मात्र आता स्तन न काढता महिलेचे सौंदर्य राखून शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याने सांगितले़
अहमदाबाद येथील डॉक़ौस्तुभ पटेल यांनी डोक्याचा व मानेचा कॅन्सरवर शस्त्रक्रियेतील दुष्परिणम रोबोटिक सर्जरीमुळे कमी झाल्याचे सांगितले़ टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉ़ पंकज चतुर्वेदी यांनी मुखाच्या कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोटपा कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितले़ तर पुण्यातील जहांगिर हॉस्पिटलच्या सर्जिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ़स्निता सिनुकुमार यांनी महिलांच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया या दुर्बिनीद्वारे केल्या जात असून महिलांचा प्रत्येक कॅन्सर बरा होत असल्याचे सांगितले़
वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन डॉ़विनायक श्रीखंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले़ यावेळी नाशिक सर्जिकल सोसायटीचे डॉ़ सुरेश मालेगावकर,सदस्य डॉ़ प्रमोद शिंदे, नाशिक इएनटी सोसायटीचे अध्यक्ष डॉ़शिरीष घन उपस्थित होते़ पुणे येथील डॉ़ अमोल बापये,डॉ़चैतन्य बोर्डे, डॉ़आदित्य मानके, डॉ़नीलेश वासेकर, डॉ़दर्शन पाटील यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले़ या परिषदेत राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़