औरंगाबादमधील लाचखोर आयकर अधिकाऱ्याच्या नाशिकमधील घरावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:40 PM2018-03-24T22:40:16+5:302018-03-24T22:40:16+5:30
नाशिक : औरंगाबादमधील एका कापड व्यापा-याकडे २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची लाच घेणारे औरंगाबाद येथील आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे यांच्या इंदिरानगर येथील प्रशस्त बंगल्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने शुक्रवारी (दि़२३) छापा टाकून लाखो रुपयांच्या बेहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त केल्याचे वृत्त आहे़ केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या या छापासत्रामुळे नाशिक शहरात चर्चेला उधाण आले आहे़

औरंगाबाद येथील आयकर विभागात कर्तव्यावर असलेले कोठावदे यांनी कापड व्यापा-याच्या २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ या उद्योजकाने याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोकडे तक्रार केल्यानंतर या अधिका-यास रंगेहाथ पकडण्यात आले़ त्याच्या औरंगाबाद तसेच नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात असलेल्या प्रशस्त बंगल्यावर शुक्रवारी (दि़२३) छापा टाकून लाखो रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त केली़
केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने जप्त केलेल्या या कागदपत्रांद्वारे आयकर अधिका-याने जमविलेली लाखो रुपयांची माया उघड होण्याची शक्यता आहे़ या अधिका-यास औरंगाबाद विशेष न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, छापा टाकण्यात आलेल्या अधिका-याने यापूर्वी नाशिक विभागातही काम केले असल्याने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांची बेहिशोबी मालमत्ता असण्याची शक्यता असून, त्यानुसार चौकशी सुरू आहे़