सोनसाखळी चोरट्याकडून दुचाकीसह साडेपाच लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:23 PM2018-05-05T22:23:51+5:302018-05-05T22:23:51+5:30
नाशिक : पादचारी महिलांचे मंगळसूत्र व मोबाइल दुचाकीवरून येत खेचून नेणाऱ्या संशयितासह एका विधिसंघर्षित बालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ कल्पेश मनोज गुंजाळ (२२, रा़ कैलासनगर, आडगाव) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के़ डी़ पाटील, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ, मच्छिंद्र कोल्हे, पोलीस हवालदार गायकर, उगले, पोलीस शिपाई नितीन नेटारे, देसले, ढगे, सुपले हे सोनसाखळी चोरट्यांचा शोध घेत होते़ त्यांना कल्पेश गुुंजाळबाबत माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोन सोनसाखळी व २७ मोबाइल तसेच दोन पल्सर दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली़ त्याच्याकडून एक लाख ८० हजार रुपयांच्या दुचाकी, दीड लाख रुपयांचे ५५ ग्रॅम सोने, दोन लाख ३५ हजार रुपयांचे २७ मोबाइल असा पाच लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
सोनसाखळी चोर कल्पेश गुंजाळ हा आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांसह गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे़ यापैकी एका साथीदारास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, दुस-याचा शोध सुरू आहे़