सभापती अहेर यांनी केली गारपिटीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 08:26 PM2020-03-01T20:26:54+5:302020-03-01T20:27:54+5:30
नाशिक : नांदगाव तालुक्यातील काही भागांत अचानक झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ...
नाशिक : नांदगाव तालुक्यातील काही भागांत अचानक झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी अहेर यांनी केली.
नांदगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे चांदोरा, पिंपरखेड, जळगाव खुर्द या गावातील शेती पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील पाहणी अहेर यांनी केली. यावेळी तहसीलदार जमदाडे यांच्याशीदेखील त्यांनी संपर्क साधला. याप्रसंगी कृषी अधिकारी जगदीश पाटील, सोपान डोखे, कृषी सहायक श्रीमती चव्हाण, तलाठी रिमा भागवत, तालुका युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, शिवराम कांदळकर, प्रताप गरुड, योगेश गरुड, अनिल सरोदे, राजू चाकणकर आदींसह संबंधित गावातील शेतकरीदेखील उपस्थित होते.
अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सदर नैसर्गिक संकट असल्याने शेतकऱ्यांनी निराश, हताश होऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.