धनादेशात खाडाखोड करून हजारो रुपयांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:36 PM2017-12-06T16:36:39+5:302017-12-06T16:40:26+5:30

नाशिक : धनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगर परिसरात घडला आहे़ याप्रकरणी अबड पोलिसांनी संशयित रवींद्र सजन कासार (रा. शेवगेदारणा, पो. नानेगाव, ता. नाशिक) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

nashik,cheque,change,fraud,crime,registered | धनादेशात खाडाखोड करून हजारो रुपयांचा अपहार

धनादेशात खाडाखोड करून हजारो रुपयांचा अपहार

Next
ठळक मुद्देधनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्याअंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : धनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगर परिसरात घडला आहे़ याप्रकरणी अबड पोलिसांनी संशयित रवींद्र सजन कासार (रा. शेवगेदारणा, पो. नानेगाव, ता. नाशिक) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सावतानगरमधील सुयोग कॉलनीतील रहिवासी दगडूलाल रामजीवन हेडा यांचा श्रीराम मार्केटींग नावाने व्यवसाय आहे़ त्यांचे गोविंदनगर परिसरातील काशिकोनगरमध्ये हेडा चेंबर्समध्ये कार्यालय आहे़ या कार्यालयात अल्ट्राटेक सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे क्लिअरिंग व फॉरवर्डींग एजन्सीमधून न्यू श्रीनाथ एजन्सी व आऱएसक़ाब्रा अ‍ॅण्ड सन्स या व्यापाºयांनी धनादेश दिले होते़ संशयित रविंद्र कासार याने कार्यालयातील धनादेश चोरून नेले़
३० ते ४ डिसेंबर या कालावधीत संशयित कासार याने धनादेश अकाऊंट पे असताना त्यावर खाडाखोड करून ते रद्द केले़ त्यासाठी संबंधित खातेदारांच्या बनावट सह्या करून रतेश कर्डक व महेश जोशी यांची नावे टाकून साठ हजार रुपयांची रक्कम संबंधित बँकेतून परस्पर काढून घेतली़ हा प्रकार लक्षात येताच हेडा यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित कासार विरोधात फिर्याद दिली़

Web Title: nashik,cheque,change,fraud,crime,registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.