मिठाई दुकानातील बालकामगाराची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:41 PM2018-06-26T16:41:43+5:302018-06-26T16:42:14+5:30

नाशिक : द्वारकाजवळील रत्ना स्वीट्स व दयावान बेकरी या दुकानातील बालकामगाराची शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका केली़

 nashik,child,labour,free,police | मिठाई दुकानातील बालकामगाराची सुटका

मिठाई दुकानातील बालकामगाराची सुटका

Next
ठळक मुद्दे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली सुटका

नाशिक : द्वारकाजवळील रत्ना स्वीट्स व दयावान बेकरी या दुकानातील बालकामगाराची शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका केली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेने १३ जून २०१८ रोजी रात्री पावणेअकरा वाजता द्वारकाजवळील रत्ना स्वीट्स व दयावान बेकरी येथे कारवाई केली. संशयित जेकब धर्मराज नाडर (४८, रा. खोडेनगर, अशोका मार्ग, नाशिक) याने आपल्या रत्ना स्वीट्स व संशयित मोईनोद्दीन अब्दुल खालिक खान (३२, रा. हरिनगरीजवळ, द्वारका, नाशिक) याने आपल्या दयावान बेकरीत बालकामगार कामावर ठेवून त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण केले, तसेच त्यांना कमी वेतन देऊन कामाच्या वेळा निश्चित न करता जास्त काम करवून घेतले.

याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी दोन्ही दुकानमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

Web Title:  nashik,child,labour,free,police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.