जिल्हाधिका:यांनी घेतला नियोजनाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 08:05 PM2020-01-15T20:05:45+5:302020-01-15T20:06:36+5:30
नाशिक: जिल्ह्यातील विकासाच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन बैठकीत होणारे निर्णय महत्वपुर्ण असल्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 18 रोजी होणा:या ...
नाशिक: जिल्ह्यातील विकासाच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन बैठकीत होणारे निर्णय महत्वपुर्ण असल्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 18 रोजी होणा:या जिल्हा नियोजन बैठकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विविध विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. समितीच्या बैठकीत मांडण्यात येणारे विषय आणि कामांच्या संदर्भातील प्रगती तसेच नवीन प्रकल्पासंदर्भातील माहिती मांडतांना घ्यावयाची काळजी आणि कामाच्या सद्यपरिस्थितीबाबतचे सादरीकरण याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाचा वार्षिक नियोजन आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती बैठकीला महत्व असल्यामुळे सर्व विभागाला आढावा सादर करावा लागतो. पालकमंत्र्यांसमोर कामकाजाचे सादरीकरण करण्यासंदर्भातील प्राथमिक आढावा बैठक घेतांना जिल्हाधिका:यांनी प्रकल्पांच्या सादरीकरणावर भर देण्याबाबची सुचना अधिका:यांना केली. जिल्हा योजनेतील मंजूर अर्थसंकल्पित तरतुदीमधील योजना राबविण्याचे अधिकार जिल्हा यंत्रणोला असल्यामुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच वार्षिक नियोजनाचा आराखडा घेतांना जिल्हाधिका:यांनी मार्गदर्शनही केले.
नियोजन बैठकीत प्रत्येक विभागाचे सादरीकरण आणि प्रकल्पांची माहिती महत्वाची असल्याने प्रलिंबत राहिलेला विषय, योजनांवर झालेला आजवरचा खर्च, प्रकल्पाची सद्यस्थिती तसेच नव्याने काही प्रकल्पांची मांडणी, सादरीकरण करावयाचे असल्यास संबंधित विभागाने कोणती भूमिका पार पाडावी याबाबत जिल्हाधिका:यांनी मार्गदर्शन केले.