पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 07:59 PM2020-02-28T19:59:06+5:302020-02-28T19:59:53+5:30

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच ...

nashik,compensation,for,fallen,homes | पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

googlenewsNext

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा महिन्यांचा कलावधी उलटूनही पडझड झालेल्या काही घरमालकांना अजूनही नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
यंदा धरणक्षेत्रात झालेला पाऊस आणि जिल्ह्यात सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर आला होता. या पुराचा सर्वाधिक फटका नाशिक शहरासह चांदोरी आणि सायखेडा या गावांना बसला तसेच बागलाण, पेठ, मालेगाव, निफाडमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. पुराच्या पाण्यात काठांवरील घरे तसेच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांमधील आणि दुकानदारांचे साहित्य वाहून गेले आहे. शेतांमध्येदेखील काही फुटांपर्यंत पाण्याचे तळे साचल्यामुळे पिकांचेदेखील नुकसान झाले होते.
या नुकसाचीने पंचनामे पूर्ण करण्यात येऊनही सर्वच नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. पीक नुकसानीची भरपाई प्राधान्याने देण्यात आली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांनादेखील तातडीची दिली जाणारी मदत देण्यात आली आहे. मात्र पडझड झालेल्या घरांसाठीची मदत लांबणीवर पडली आहे. पंचनाम्यानंतर संबंधित घराला मान्यता आहे किंवा नाही याबरोबरच संबंधित घरमालकाला धोकादायक घर म्हणून नोटीस बजविण्यात आली होती का? या मुद्द्यावर नुकसानभरपाई रखडली आहे.
पंचनामे आणि प्रांतांनी नुकसानीस पात्र ठरवूनही आता, मात्र अधिकृत अनधिकृतच्या मुद्द्यावर सुमारे ३५ लाखांची भरपाई अजूनही नुकसाग्रस्तांनी मिळू शकलेली नाही.
पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १६ पथकांनी अंशत: आणि पूर्णत: पडलेल्या ९६४ घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. घरांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागांतही अशा प्रकारचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुरामुळे ज्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले त्यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेल्या मदतीचे सुमारे ५१४ कोटींचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र ज्यांचे घरे वाहून गेली त्यातील अनेक बाधित अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: nashik,compensation,for,fallen,homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.