दुचाकी चोरट्याकडून कारसह पल्सर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 10:11 PM2017-08-11T22:11:18+5:302017-08-11T22:11:57+5:30
नाशिक : शहर परिसरातून महागड्या दुचाकी तसेच कार चोरणाºया तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने टिळकवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी, एक कार व तीन मोबाईल असा २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहेत़ संशयित पप्पु उर्फ गौरव विजय बागडे (रा. आयटीआय कॉलनी, आंबेडकर हॉलसमोर, शिवाजीनगर, सातपूर), ज्ञानेश्वर मोतीराम दिवे (रा. राजीव गांधीनगर, गंगापूर) व सुजल राजेंद्र कनोजिया (रा. ध्रुवनगर, शिवाजीनगर, गंगापूर) अशी या चोरट्यांची नावे आहेत़विशेष म्हणजे यातील कनोजिया हा एका गॅरेजमध्ये काम करणारा कारागीर आहे़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना टिळकवाडी सिग्नलनजीकच्या बाफणा ज्वेलर्स परिसरात सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतलेअसता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली़ मात्र त्यांना पोलीस खाक्या दाखविताच दुचाकी चोरण्यासाठी ते या परिसरात आल्याची माहिती दिली़ तसेच यापुर्वी सातपूरमधून दोन तर गंगापूरमधून एक पल्सर दुचाकी व महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली़
पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, दीपक गिरमे, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, जाकीय शेख, संजय पाठक, चंद्रकांत पळशीकर, अनिल दिघोळे, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, मोहन देशमुख, दिलीप मोंढे, संतोष कोरडे, रावजी मगर, स्वप्निल जुंद्रे, राहुल पालखेडे, विशाल काठे, विशाल देवरे, शांताराम महाले, गणेश वडजे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार यांनी ही कामगिरी केली़