लाडची जि.प. शाळेची शेवगा रोपवाटीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:15 PM2019-04-24T18:15:06+5:302019-04-24T18:17:06+5:30
नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने सेवगा रोपवाटीका तयार केली ...
नाशिक: कुपोषण मुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने सेवगा रोपवाटीका तयार केली असून या रोपवाटीकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये मागील वर्षी शेवगा लागवडीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चळवळ सुरु केली होती. यापासूनच प्रेरणा घेत नाशिक तालुक्यातील लाडची येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी शेवगा रोपवाटिका तयार केली आहे.
कुपोषणाच्या निर्मुलनासाठी मागील वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम विकास केंद्र सुरु केले होते. तसेच तालुका आढावा बैठकांमध्ये शेवगा लागवडीविषयी माहिती देवून ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शेवगा लागवड करण्यासाठी आवाहन केले होते. या उपक्र माची दखल घेत अनेक शेतक-यांनी जिल्हा परिषदेला शेवगा बियाणे उपलबध करु न दिले होते. नाशिक तालुक्यातील लाडची शाळेतील विज्ञान शिक्षक विवेक खैरनार यांनी विद्यार्थ्यांबरोबर र चर्चा करु न शेवगा रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मुख्याध्यापक विजयकुमार मोरे यांनीही या उपक्र माचे कौतूक करु न त्यामध्ये सहभाग घेतला.