छापील वीजबील भरणा पावती हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 08:29 PM2019-09-16T20:29:24+5:302019-09-16T20:30:49+5:30
नाशिक : ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीजबील भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट ...
नाशिक: ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीजबील भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितणची छापील पावती हद्दपाल होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बीलभरणा झाल्याची खात्री देखील करून घेता येणार आहे.
नाशिक परिमंडळातील नाशिक शहर १ व १ आणि मालेगाव या विभागासह हा उपक्र म राज्यातील २५ शहरी विभागांमध्ये सोमवार दि. १६ पासून अंमलात येणार असून याचा शुभारंभ नाशिकरोड येथील विद्युत भवनच्या आवारात असलेल्या दत्ताजी देशमुख पतसंस्थेच्या वीज बिल भरणा केंद्रावर करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांच्या हस्ते ग्राहकाला नवीन स्वरूपातील पावती देऊन औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, वरिष्ठ व्यवस्थापक दिनकर मंडलिक, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने, व्यवस्थापक मंगेश गाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन अदि उपस्थित होते.
विजबील भरणा करणाºया ग्राहकांना आता संगणकीकृत क्र मांक असणाºया पावत्या कोºया कागदावर छापून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हा संगणकीकृत क्र मांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपवर वीजिबल भरल्याची खात्री करता येईल.