गोवर लसीकरणात जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:08 PM2019-01-11T17:08:12+5:302019-01-11T17:09:00+5:30

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट ...

nashik,district,tops,cattle,vaccines | गोवर लसीकरणात जिल्हा अव्वल

गोवर लसीकरणात जिल्हा अव्वल

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : उर्वरित लसीकरणाला प्राधान्य


नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. महापालिका हद्दीमध्ये अपेक्षित काम अद्यापही झाले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात आत्तापर्यंत १० लक्ष ७४ हजार ३९८ मुलामुलींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठा प्रमाणावर गोवर, रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू असून, प्रत्येक शाळांमध्ये लसीकरणाची जागरूकता करण्यात आल्याने लसीकरणाला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात ११,३९,५४९ लाभार्थी आहेत. असून आत्तापर्यंत १०,७४,३९८ मुलामुलींचे लसीकरण करण्यातं ाले आहे. लसीकरणाची दैनंदिन आकडेवारी ही वाढती असल्याने निर्धारित वेळेत जिल्ह्याने ९४ टक्केपर्यंत लसीकरणाची मजल मारली आहे. वयवर्षे नऊ महिने ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना या मोहिमेत लसीकरण केले जात आहे.
या मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे हे नियमित जिल्ह्यामध्ये नगरपालिका, उपकेंद्र, शाळा, येथील लसीकरणाला भेटी देत असून, कार्यक्र माची नियमित तळ पडताळणी करण्यात येत आहे.
लसीकरणाबाबत असलेल्या अनेक गैरसमजातून प्रारंभ लसीकरणाला अनेक अडचणी आल्या, परंतु त्यानंतर झालेल्या व्यापक जनजागृतीमुळे मोहिमेला गती प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची लसीकरण यामधील गुंतागुंत आढळून आलेली नाही शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचे या मोहिमेला पाठबळ मिळाल्याने मोहिमेला गती आली आहे.

Web Title: nashik,district,tops,cattle,vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.