रस्ता भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी ‘थाळीनाद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 06:18 PM2019-02-13T18:18:32+5:302019-02-13T18:19:16+5:30
नाशिक : रस्ता कामांची प्रत्यक्ष पाहाणी न करता न केलेल्या कामासाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारास ३० लाखांचे देयके अदा केल्याचा ...
नाशिक: रस्ता कामांची प्रत्यक्ष पाहाणी न करता न केलेल्या कामासाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारास ३० लाखांचे देयके अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवासेनेच्या माध्यमातून थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
त्र्यंबकरोडवरील गोल्फ कल्ब मैदानावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख मिथून राऊत, संपतराव सकाळे, विनायक माळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपाजंली माळेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी थाळीनाद करण्यात आला. त्यानंतर, उपोषणास सुरूवात झाली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता सुधारणा करणे व बोरपाडा ते वरसविहीर रस्ता सुधारणा या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी १५ लाख बांधकमा विभाग कार्यकारी अभियंता यांनी देयके मंजूर केलेली आहेत. सदर काम प्रत्यक्ष साईटवर न करता सार्वजानिक बांधकाम विभागांचे झालेले काम दाखवून जिल्हा परिषदेने बील अदा केले आहे. यात संबंधित ठेकेदारांने शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे. सदर दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन गावांना जोडणाºया रस्त्याचे कामे न करता थेट देयके अदा करणाºया दोषींवर कारवाई न केल्याने आक्रामक झालेल्या त्र्यंबक युवासेना व विनायक माळेकर यांनी बेमुदत थाळीनाद आंदोलन केले. कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका माळेकर यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. नेरश गिते यांना निवेदनही देण्यात आले आहे.