शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमली क्रांतीभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 05:43 PM2020-02-19T17:43:27+5:302020-02-19T17:44:27+5:30
भगूर : येथील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, शासकीय कार्यालये तसेच शाळांच्यावतीने विविध कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ...
भगूर : येथील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, शासकीय कार्यालये तसेच शाळांच्यावतीने विविध कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
सकाळी करंजकर गल्लीतील नगराध्यक्ष निवासी छत्रपती तालिम संघ व शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष अनिता करंजकर, शिक्षकसेना उपजिल्हा प्रमुख संग्राम करंजकर.नगरसेविका कविता यादव.अनिता ढगे.प्रतिभा घुमर, अश्विनी साळवे, नितीन करंजकर, नंदराज करंजकर, सुनील करंजकर, सचिन करंजकर यांचे हस्ते शिवपुतळ्याचे पुजन करण्यात आले. चौकातील शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगराध्यक्ष अनिता करंजकर, नगरसेविका जयश्री देशमुख, काकासाहेब देशमुख, नरेश देशमुख, शाम देशमुख, अभिषेक चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
भगूर नगर परिषद, मनसे,सावरकर सेना प्रबोधन संघटना, बारा बलुतेदार, बलकवडे व्यायाम शाळा सावरकर उत्सव समिती, क्र ांती चौक शिवसेना, भीम सम्राट मंडळ, प्रेस कामगार मंडळ, जेष्ठ नागरिक संघ, मेनरोड फ्रेंड सर्कस, युवा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बौद्ध हृदयसम्राट मंडळ, आठवडे बाजार मंडळ, गजानन महाराज मंडळ सुभाष रोड, शिवसेना सुकापुर पेठ मंडळ, मराठा सेवा संघ ति.झ.विद्यामंदिर प्राथमिक शाळा, शितळा मित्र मंडळ आदिंनी जयंती साजरी केली.
ठिकठिकाणी व्यासपीठ उभारु न शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आणि पुतळे ठेवण्यात आले होते. साक्षी विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली शिवकन्या महिला मोटारसायकल रॅली परिसरातून काढण्यात आली. नगरसेविका जयश्री देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी जय शिवाजी पोवाडे भक्तीगीतीचा कार्यक्र म झाला.
शिवसेना शहरप्रमुख विक्र म सोनवणे, शामराव ढगे, आर.डी.साळवे, कैलास भोर, सुमित चव्हाण, मोहन करंजकर, फरीद शेख, विशाल बलकवडे, संजय शिंदे, मोहन गायकवाड, अंबादास आडके, प्रमोद घुमरे, दिनेश आर्य, संजय पवार, दिपक बलकवडे, रवींद्र संसारे, श्रीराम कातकाडे, अंबादास कस्तुरे, कैलास यादव, महेंद्र पगारे, राजेंद्र लोया, मनोज कुवर, शाम देशमुख, निलेश हासे, पप्पू ताजनपुरे, मयूर गायकवा, संभाजी देशमुख, उत्तम अहेर, सुदाम वालझाडे, रामदास घोरपडे, दत्ताजी चव्हाण, मंगेश शेटे, उपस्थित होते