नाशिक द्वारकावरील जुगार अड्ड्यावर छापा : पन्नास हजारांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:45 PM2018-03-02T15:45:38+5:302018-03-02T15:45:38+5:30
नाशिक : द्वारका परिसरातील महालक्ष्मी चाळीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी (दि़१) दुपारी छापा टाकला़ यामध्ये चार जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

वडाळा नाक्याजवळील महालक्ष्मी चाळीत जुगार सुरू असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली़ त्यानुसार दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित अर्जुन अरुण पवार (२९), दीपक पन्नालाल पवार (२७), गणेश रामसिंग पवार व कपिल अरुण पवार (२३, सर्व रा. घर नंबर १८, महालक्ष्मी चाळ, द्वारका, नाशिक) हे पत्त्यांच्या कॅटवर अंदर- बाहर नावाचा जुगार खेळत होते़
भद्रकाली पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या चौघाही संशयितांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़