निफाड केंद्रात शिक्षण परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:47 PM2019-07-29T13:47:18+5:302019-07-29T13:48:01+5:30
नाशिक : विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तसेच शैक्षणिक नियोजनाबरोबरच सकारात्मक अध्यापन पद्धती विषयक निफाड केंद्रातील शिक्षकांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. केवळ ...
नाशिक: विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तसेच शैक्षणिक नियोजनाबरोबरच सकारात्मक अध्यापन पद्धती विषयक निफाड केंद्रातील शिक्षकांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. केवळ शिकविणे हा कामाचा भाग नाही तर परिणामकारक अध्यापन करणे हे उद्दीष्ट असले पाहिजे असे यावेळी तज्ज्ञ शिक्षकांनी यावेळी सांगितले.
निफाड येथील जिल्हा परिषदेची आयएसओ मानांकीत उच्च माध्यमिक शाळा क्रमांक १ येथे या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी तुंगार, विस्तार अधिकारी थोरात, केंद्रप्रमुख विश्वास साळुंखे उपस्थित होते. या परिषदेनिमित्ताने संपुर्ण शाळेचा परिसर सजविण्यात आला होता. आकर्षक रांगोळ्या काढून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या परिषदेत वार्षिक नियोजन, गुणवत्ता चाचणी, शालेय पोषण आहार याबाबतचा आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शक गणित मित्र वाल्मिक चव्हाण यांनी गणित विषयासंदर्भात विविध संकल्पना सोप्या पद्धतीने व विद्याथी सहभाग घेऊन कसा प्रभावी पद्धतीने राबविता येईल याविषयीच्या संकल्पना सांगितल्या. वार्षिक नियोजनावर मनिषा निफाडे, वर्गनियोजन दादाजी अहिरे, संतोष मेमाणे, शालेय व्यवस्थापन समिती जबादारी व कर्तव्य मंगल गोसावी, सचिन चव्हाण, व्हिडीओ प्रेझेंटेशन प्रमोद चव्हाण, गुणवत्ता चाचणी प्रश्नपत्रिका नीलेशा शिंदे, शालार्थ वेतन सुरेश धारराव, यांनी मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन सचिन चव्हाण यांनी केले तर आभार कुमार जंगम यांनी मानले.