जिल्ह्यात १३३० कोटींची वीजबिल थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:38 PM2018-03-16T23:38:08+5:302018-03-16T23:38:08+5:30
नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणने पारंपरिक वीज बिल भरणा केंद्रासह चोवीस तास केव्हाही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महावितरण मोबाइल अॅपद्वारेदेखील बिल भरण्याची व्यवस्था केली आहे. याबरोबरच बिल भरण्यासाठीच्या अनेक योजना अॅप, संकेतस्थळांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. आॅनलाइन पद्धतीने वीज बिल भरण्याला ग्राहकांचा प्रतिसाद असल्याने ग्राहकांनी या माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकूण १४ लाख ९ हजार ५०२ ग्राहकांपैकी ६ लाख २३ हजार ६४७ म्हणजेच जवळपास ४४ टक्क्यांहून अधिक ग्राहक थकबाकीदार आहेत. वर्गवारीनिहाय ग्राहक व थकबाकी- घरगुती : ग्राहक-२ लाख ९७ हजार ३४२, थकबाकी-३३ कोटी ९३ लाख रु पये, व्यावसायिक : ग्राहक- ३४ हजार ७९७, थकबाकी-१५ कोटी १० लाख रु पये, औद्योगिक : ग्राहक-४४९९, थकबाकी-६ कोटी २८ लाख रु पये, कृषिपंप : ग्राहक-२ लाख ७२ हजार ४९७, थकबाकी- ११४८ कोटी ९५ लाख रु पये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना : ग्राहक-१५५९, थकबाकी-२१ कोटी २० लाख, पथदीप : ग्राहक- ३६१६ थकबाकी-९० कोटी ६६ लाख, यंत्रमाग : ग्राहक-४५९७, १० कोटी ८२ लाख, इतर : ग्राहक-४७६३, थकबाकी-३ कोटी ४८ लाख अशी थकबाकी आहे.