कोकण प्रादेशिक विभागात ८ कोटींची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 08:00 PM2020-01-15T20:00:08+5:302020-01-15T20:01:17+5:30

नाशिक : कोकण प्रादेशिक विभागात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विभागात विजेचा चोरटा तसेच अनिधकृत वापर करणाऱ्या १ हजार ३७१ जणांविरु ...

nashik,electricity,four,crore,in,konkan,regional,zone |  कोकण प्रादेशिक विभागात ८ कोटींची वीजचोरी

 कोकण प्रादेशिक विभागात ८ कोटींची वीजचोरी

googlenewsNext
ठळक मुद्देदिड कोटींचा दंड: थकीत वीजबील वसुलीची मोहिम



नाशिक: कोकण प्रादेशिक विभागात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विभागात विजेचा चोरटा तसेच अनिधकृत वापर करणाऱ्या १ हजार ३७१ जणांविरु द्ध कारवाई करून ८ कोटी १0 लाख रु पयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. यातील ८४३ जणांकडून १ कोटी ५१ लाख रु पये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांतील १५ जिल्ह्यांचा समावेश होतो. डिसेंबर-२०१९ अखेर विभागात विजिबलाची ५५७ कोटी रु पयांची थकबाकी असून थकीत बिलाच्या वसुलीसाठी १ जानेवारीपासून आतापर्यंत १९ हजार २२८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता किंवा कायमचा खंडित कारण्यात आला आहे. थकीत वीजबीलांच्या वसुलीसाठी नियोजन करण्याच्या सुचना विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दिल्या. मुख्य अभियंते ब्रिजपालिसंह जनवीर, दिनेश अग्रवाल,दीपक कुमठेकर, श्रीमती पुष्पा चव्हाण व रंजना पगारे यांच्यासह कोकण प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आढावा बैठकीला उपस्थित होते.
वीज पुनर्रजोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही.कोकण प्रादेशिक विभागात गेल्या १५ दिवसात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या १७ हजार २६२ ग्राहकांनी २२ लाख रुपयांची पुन:र्जोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे विजिबलाचा वेळेत भरणा करून संभाव्य गैरसोय टाळावी व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांना केले आहे.

Web Title: nashik,electricity,four,crore,in,konkan,regional,zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.