शहरात अनेक ठिकाणी वीजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:27 PM2019-04-08T17:27:56+5:302019-04-08T17:30:54+5:30

नाशिक : ऊन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या ...

nashik,electricity,in,many,places,in,the,city | शहरात अनेक ठिकाणी वीजेचा लपंडाव

शहरात अनेक ठिकाणी वीजेचा लपंडाव

Next
ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय: ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

नाशिक: ऊन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त आहे. शहराचे तापमान ४० अंश सेल्सीअस पर्यंत असतांना वीजेअभावी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याबाबत महावितरणच्य अभियंत्यांना विचारणा करूनही शहरात असा प्रकार होत नसल्याचा पवित्रा या अभियंत्यांनी घेल्यामुळे रोष अधिकच निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपुर्वी नाशिकरोडमधील एका वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन ते अडीच तास नाशिकरोडचा वीजपुवठा खंडीत झाला. त्यानंतरही या भागात अजूनही विस्कळीत वीजपुरवठा असून खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नाशिक शहरातही सोमवारी दुपारपासून अनेकदा वीजपुरवठा खंडीत झाला होता. मोठ प्रमाणात व्यापारी आणि रहिवासी क्षेत्र असलेल्या अनेक भागांमध्ये जनरेटरचा वापर करावा लागला. सातत्याने जनरेटर सुरू करणे आणि वीजपुरवठा सुरळीत झाला की बंद करणे अशी परेड करावी लागत होती.
या संदर्भात महावितरणच्या कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी अन्य एका अधिकाऱ्याला संपर्क साधण्यास सांगितले. संबंधित महाशयांना फोन केला असता कोणत्या परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला असा प्रतिप्रश्न त्यांनीच विचारला. सर्वकाही ऐकून घेतल्यानंतर त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. ग्राहकांच्या तक्रारी आणि अडचणी देखील अभियंत्यांना माहिती नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलेच शिवाय टोल फ्री क्रमांकावरून संपर्क करूनही पलिकडील व्यक्तीला सर्वकाही माहिती आपणालाच दयावी लागते. ग्राहकांच्या प्रश्नांबाबत नेहमीच उदासिनता दाखविली जाते. सोमवारी देखील अनेकांना असाचा अनुभव आला.

Web Title: nashik,electricity,in,many,places,in,the,city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.