५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडरवर भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 05:26 PM2018-10-10T17:26:06+5:302018-10-10T17:29:23+5:30

नाशिक : आॅक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले असताना ग्राहकांना भारनियमनाचेदेखील संकट ओढवले आहे. उपलब्ध वीज आणि मागणी यांचा ताळमेळ बिघडल्याने सुमारे २००० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. बुधवारी यात काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र वीज उपलब्धतेची अनियमितता कायम असल्याने भारनियमन अटळ मानले जात आहे.

nashik,electricity,loadsheding,feedar,mahavitran | ५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडरवर भारनियमन

५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडरवर भारनियमन

Next
ठळक मुद्देभारनियमनाचे संकट : वीज उपलब्धतेत काही प्रमाणात सुधारणाऔष्णिक वीजनिर्मिती घटल्यामुळे विजेचा तुटवडा

नाशिक : आॅक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले असताना ग्राहकांना भारनियमनाचेदेखील संकट ओढवले आहे. उपलब्ध वीज आणि मागणी यांचा ताळमेळ बिघडल्याने सुमारे २००० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. बुधवारी यात काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र वीज उपलब्धतेची अनियमितता कायम असल्याने भारनियमन अटळ मानले जात आहे. अगोदरच विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असताना आता भारनियमनाला ग्राहकांना सामोरे जावे लागणार आहे.
राज्यातील विजेच्या उपलब्धतेत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी ५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडर्सवरील ग्राहकांना भारनिमयनाचा सामना करावा लागणार आहे. महावितरणची विजेची मागणी सुमारे १९५०० मेगावॉट इतकी असताना औष्णिक वीजनिर्मिती घटल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी विजेची तूट ही सुमारे २००० मेगावॉटपर्यंत पोहोचली होती. आता यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी भारनियमनाचे संकट मात्र कायम आहे.
राज्यात कोळशावर होणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून महावितरणला मिळणाºया विजेची उपलब्धता कमी झालेली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून विजेसाठी राखून पाण्याच्या वापरावर मर्यादा असल्याने तेथून जास्तीची वीज निर्माण होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महावितरणणे ज्या फिडरवर वीज वितरण हानी आणि वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी आहे अशा फिडरवर भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या फिडरवर ५८ टक्केपेक्षा अधिक वीज वितरण हानी आहे अशा सर्व फिडर्सवर भारनियमन होणार आहे. त्यानुसार जी-१ (५८ ते ६६ टक्के), जी-२ (६६ ते ७४ टक्के), जी-३ गटात ७४ टक्केपेक्षा अधिक वीज वितरण हानी आणि वसुलीचे प्रमाण आहे. त्यामुळे या गटातील ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागणार आहे. महावितरणच्या या निर्णयाचा फटका काही ग्राहकांना बसणार असला तरी शहरातील ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
--इन्फो--
या स्रोतांकडून महावितरणला मिळते वीज
केंद्रीय प्रकल्प, महानिर्मिती, गॅस प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्प, अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्ल्यू, पवन ऊर्जा आणि सौरऊर्जा.

Web Title: nashik,electricity,loadsheding,feedar,mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.