विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 05:25 PM2019-09-09T17:25:51+5:302019-09-09T17:26:40+5:30

नाशिक : उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणे अभिनव उपक्रम ...

nashik,electricity,safety,gate,mahavitran |  विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी‘

 विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी‘

Next
ठळक मुद्देउपक्रम: ऊर्जा संवर्धन, सुरक्षा विषयावर करणार प्रबोधन

नाशिक: उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणे अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गणेशोत्सवात विद्युत सुरिक्षतता अबाधित राखण्यासाठी तसेच या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी महावितरणच्यानाशिक शहर विभाग २ अंतर्गत महावितरण गणपतीच्या दारी हा उपक्र म राबविण्यात येत आहे.
महावितरणकडून गणेश मंडळांना सवलतीच्या दरात अधिकृत तात्पुरती वीजजोडणी देण्यात येते. या सर्व गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतल्याची खात्री करणे, न घेतल्यास आणि विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती आदी उद्देशाने विभागात सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. वीज गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे सहाय्यक अभियंता या पथकांचे नेतृत्व करीत आहेत. आतापर्यंत या उपक्र मात नाशिक रोड, जेलरोड, देवळाली,भगूर, आडगाव, द्वारका,आणि उपनगर परिसरातील ८१ गणेश मंडळांची भेटी देऊन वीजजोड, वायरिंग आदींची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरु स्ती करून सूचना देण्यात आल्या. तसेच या गणेश मंडळाच्या दर्शनी भागात ऊर्जा संवर्धन व सुरक्षेबाबत जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले. गणेश मंडळ पदाधिकारी व भक्तांकडूनही महावितरणच्या या उपक्र माचे कौतुक होत आहे.

Web Title: nashik,electricity,safety,gate,mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.