सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 03:52 PM2019-08-19T15:52:41+5:302019-08-19T15:53:33+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी मतदान यंत्रे तसेच व्हीव्हीपॅट मशीन्स दाखल झालेल्या असून, अंबड येथील सेंट्रल वेअरहाउस येथे मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली आहेत. निवडणूक कामाची जबाबदारी असलेले अधिकारी आणि कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून येथे निवडणूकपूर्व कामाला लागले आहेत.
विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान कर्मचाºयांची तत्परता या जोरावर नाशिक जिल्ह्याने निवडणुकीच्या कामात आघाडी घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची काही यंत्रे दाखल झाली आहेत. या यंत्रणांसाठी लागणाºया पूरक साहित्यांची जमवाजमवदेखील करण्यात आलेली आहे. अंबड येथे सध्या या यंत्रांसंदर्भात कर्मचाºयांना काही सूचना आणि मार्गदर्शन केले जात आहे.