अभियंत्याविरूद्ध कर्मचारी संघटनांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 07:24 PM2019-11-17T19:24:11+5:302019-11-17T19:25:13+5:30
नाशिक : वीज ग्राहकाला मोबाईल क्रमांक दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यास धाऊन जाणाºया भद्रकाली उपविभागाच्या सहायक अभियंत्याविरुद्ध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने ...
नाशिक: वीज ग्राहकाला मोबाईल क्रमांक दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यास धाऊन जाणाºया भद्रकाली उपविभागाच्या सहायक अभियंत्याविरुद्ध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबधित अभियंत्यावर निलंबनाची कारवार्ई करण्याची मागणी केली.
या संदर्भात कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भद्रकाली कक्ष ३ शहर उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांने कर्तव्यावर असलेले कर्मचारी दिलीप काशिनाथ भोये यांना मोबाईल नंबर ग्राहकाला दिल्याच्या कारणावरून हेल्मेट घेऊन अंगावर धाऊन आल्याचे म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संयुक्त कृती समितीच्यावतीने भद्रकाली शहर उपविभाग कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, मागासवर्गीय संघटना, इलेक्तिट्रक लाईन स्टाफ संघटना या कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले होते.
यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता जनवीर यांना तक्र ारीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दिलीप काशिनाथ भोये, तंत्रज्ञ हे दुसºया पाळीत ड्युटीवर असतांना कापड बाजारातील वीज पुरवठा खंडीत केलेले एक ग्राहक भरलेले वीज बील घेऊन आले. वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली अशावेळी रिकनेक्शन चार्जेस भरल्याशिवाय वीज पुरवठा पूर्ववत करता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले.
सदर बाब संबंधित अभियंत्यांस समजल्यानंतर त्यांनी भोये यांना जाब विचारु न शिविगाळ केली व सोमवार पासून तुमच्याकडे बघतो असा दम भरला. एवढ्यावरच न थांबता हेल्मेट मारु न फेकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही भोये यांनी केला आहे. सदर बाब कामगार संघटना पदाधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन घोषणाबाजी केली.यावेळी सहाय्यक अभियंता पेंढारकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्वरीत निलंबन झाले पाहिजे, , आदी मागण्यांचे निवेदन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना दिले.