संपूर्ण शाळा लसीकरणाचा फार्म्युला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:25 PM2018-09-06T16:25:52+5:302018-09-06T16:26:39+5:30
नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार भारतात रुबेला आणि गोवर निर्मूलन मोहीम राबविली जात असून, या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील मुलांसाठी गोवर, रुबेला निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नांदगाव येथे रुबेला, गोवर मोहिमेबाबत पंचायत समितीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक प्रशांत केळकर, डॉ. जगताप, डॉ. घोडके, डॉ. नवरे, डॉ. झुंबाड, तुपे आदी उपस्थित होते. येत्या १४ नोव्हेंबर रोजी सदर मोहीम सुरू होणार असून, ९ महिने ते १५ वर्ष (सध्या १० वी च्या वर्गातील विद्यार्थी ) वयोगटातील मुला-मुलींना उजव्या हातावर इंजेक्शन द्यायचे असून, या माेिहमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थींपैकी शाळेतील लाभार्थींना प्रत्येक शाळेत एकाच दिवशी एका टीमने २०० प्रमाणे तीन खोल्यांमध्ये लस देण्यात येणार आहे. एकाच दिवशी संपूर्ण शाळा लसीकरण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
९ महिने ते ५ वर्षेसाठी अंगणवाडीमध्ये लसीकरण करावे. या कार्यशाळेनंतर राजेंद्र बैरागी यांनी संघटनेच्या माध्यमातून माहिती देत आरोग्य विषयक कामांव्यतिरिक्त कर्मचाºयांना इतर विभागाचे कामे सोपवू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मन्सुरी आभार यांनी मानले.
(आर.फोटो: ०६रुबेला)