पर्यावरणाचा संदेश देण्याचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:49 PM2019-03-27T18:49:53+5:302019-03-27T18:50:38+5:30
नाशिक : सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या रोजगाराबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याऱ्या जेसीआय अंबडने यंदा होळीच्या सणाला नागरिकांना पर्यावरण ...
नाशिक: सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या रोजगाराबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याऱ्या जेसीआय अंबडने यंदा होळीच्या सणाला नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा सल्ला देत रोपांचे वाटप केले.
इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक येथे पहाटेच्या सुमारास वृक्षरोपे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या २८ वर्षांपासून अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. होळीच्या मुहूर्तावर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे वृक्ष रोपांच्या वाटपाचे काम जेसीआय अंबडच्या सभासदांनी केले. अशोका,, अडुळसा , बेल , सर्पगंधा ,मोगरा, शतावरी , गुलाबी धोत्रा व शेवगा अशा विविध भारतीय झाडांचे रोप विनामूल्य वाटण्यात आले.
प्रकल्प संयोजक अजिंक्य काटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष प्रतीक कुलकर्णी यांनी प्रकल्पाचे प्रास्ताविक केल. या प्रसंगी माजी अध्यक्ष डॉ. धनंजय अहिरे, प्रमोद वाघ, चेतन पाटील, विशाल तांदळे, चैतन्य भुजंग ,वृषाली खाकुर्डीकर,अश्विन सोनावणे, अमीत कोतकर, नागेश पिंगळ ेरमण साळी, प्रणव महाजन, अद्वैत निफाडकर, अंकुश जाजू, प्रवीण वालझाडे, निनाद जाधव आदी सभासद उपस्थित होते. आभार सचिव विवेक पाटील यांनी मानले.